मारियाच करणार बोरा हत्याकांडाचा तपास
गृहरक्षक विभागाचे महासंचालकपदी राकेश मारिया यांना बढती देण्यात आली असली तरी सध्या गाजत असलेल्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास त्यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने तसे अधिकृत पत्र मारिया यांना दिले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्या देखरेखीखाली कायम ठेवण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. या हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी मारिया यांना थेट रिपोर्ट करतील, असेही गृह राज्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
