मोदी यांची 'मन की बात' 30 ऑगस्टला
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरून जनतेशी संवाद साधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘मन की बात‘ 30 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधानांनी आज ट्विटरच्या माध्यमातून आपण 30 ऑगस्टला या कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.
‘मन की बात‘ कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी विविध विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. मोदींनी यापूर्वी काळा पैसा, शेतकरी, परीक्षा अश्या विविध विषयांवर ‘मन की बात‘या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान प्रथमच रेडिओवर ‘मन की बात‘ या कार्यक्रमातून एकत्र आले होते.
