मोदींची तोफ आता बिहारमध्ये धडाडणार
अमेरिका दौरा गाजविल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज झाले आहेत. लवकरच जाहीर सभांमध्ये त्यांची तोफ धडाडणार आहे.
मोदींच्या बिहारमध्ये दोन टप्यामध्ये 20 सभा घ्याव्यात अशी मागणी बिहार भाजपने केली आहे. मात्र, मोदींच्या त्याहून जास्त सभा होण्याची शक्यता आहे. दोन आॅक्?टोबरला बॉंका येथे, चार आॅक्टोबरला लाडोसराय येथे; तसेच आठ, दहा व 13 आॅक्टोबरला मोदी यांच्या प्रचारसभा होतील. दुसºया टप्प्यातही अशाच सभा होतील व अखेरच्या मतदान टप्प्याच्या प्रचार सांगतेवेळी पंतप्रधानांसह भाजप आघाडीचे तमाम मुख्य नेते पाटण्यात विजय- अभिनंदन सभा घेतील असे भाजपचे नियोजन आहे.
