1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. या गुजरातीमुळे पीएम मोदी पडले अडचणीत...

या गुजरातीमुळे पीएम मोदी पडले अडचणीत...

पीएम नरेंद्र मोदी तसे तर देशातील सर्वात जास्त शक्तिशाली शख्‍सियत असणारे मानले जातात, पण सध्या त्यांना सर्वात मोठे आव्हान मिळत आहे हार्दिक पटेलहून, जो गुजरातचा आहे. हार्दिक पटेलने पटेल-पाटीदार समाजातील मागास वर्गाला आरक्षण देण्याच्या मागणीला घेऊन असे आंदोलन केले आहे की समाजात तो तरुणांचा आर्दश बनून गेला. रॅलीत ज्या प्रकारे हार्दिक बोलत होता त्याने हे स्पष्ट दिसू लागले होते की त्याचा आत्मविश्वास चरम वर आहे आणि त्याला माहीत आहे की तो जनबल आणि धनबलमध्ये फारच मजबूत समाजाची पेरवी करत आहे. आपण जाणून घेऊ कोण आहे हार्दिक पटेल...
 
पटेलने अहमदाबादच्या सहजानंद कॉलेजमधून बीकॉम केले आहे आणि नंतर वडिलांच्या पाण्याच्या सप्लायच्या व्यवसायात त्यांना हातभार लावू लागला आहे. त्या वेळेस त्याला या गोष्टीचा थोडाही अंदाज नव्हता की तो लवकरच त्या आंदोलनाची नीव ठेवेल ज्याचा आवाज राष्ट्रीय स्तरावर होईल.     
 
हार्दिकने मागील जुलैमध्ये पाटीदार अनामत आंदोलनाची नीव टाकली. त्याने पटेल समुदायाच्या तरुणांसोबत आरक्षणाच्या नावावर होत असलेले भेदभावाच्या विरोधात आवाज उठवून पटेलांना ओबीसीचा दर्जा देण्याची मागणी केली. शाळा-कॉलेजांमध्ये अॅडमिशनपासून नोकरीपर्यंत आरक्षणाची मागणी केल्याने त्याला गुजरातच्या पाटीदार समाजाचा पूर्ण समर्थन मिळाला.   
 
आरक्षणाच्या मागणीला घेऊन हार्दिकचे म्हणणे आहे की, 'पटेल समुदायाच्या एखाद्या तरुणाला 90 टक्के नंबर असले तरी एमबीबीएसमध्ये  अॅडमिशन मिळत नाही, तसेच आरक्षणाच्या दमावर लोकांना 40-45 टक्के नंबर असले तरी त्यांना अॅडमिशन आणि नोकरी मिळते.' गुजरातची एकूण जनसंख्येत पटेल किमान 20 टक्के एवढे आहे. हा समुदाय नेहमीपासूनच फार मजबूत राजनैतिक, आर्थिक आणि   सामाजिक रूपेण सुदृढ मानला जातो.  
 
हार्दिक या अगोदर पाटीदारच्या युवा संगठन 'सरदार पटेल ग्रुप'चा सदस्य होता. तो या संगठनाच्या वीरमगाम शाखेचा अध्यक्षपण होता. नंतर त्याला हे पद सोडावे लागले होते कारण एसपीजीचे नेते लालजी पटेल हार्दिकच्या पाटीदार अनामत आंदोलनाच्या योजनेच्या समर्थनात नव्हते. एसपीजी सोडल्यानंतर देखील हार्दिकने जुलैत या आंदोलनाची नीव टाकली.  
 
जेव्हा हार्दिक पाटीदार आरक्षणासाठी काम करत होता, तेव्हा एसपीजी नेत्यांनी त्याच्या विरुद्ध संगठनाचे 2 लाख रुपए परत न करण्याचा आरोप लावून एफआयआर नोंदवली होती. हार्दिकचा आरोप आहे की राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.  
 
असे मानले जाते की मागील निवडणुकीत हार्दिकने आम आदमी पक्षाचे समर्थन केले होते. काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हार्दिकने हे आंदोलन चालवत आहे. त्याने अहमदाबादामध्ये म्हटले की त्याला केजरीवालप्रमाणे मोठे आंदोलन चालवायचे आहे.  
 
अहमदाबादामध्ये ज्या प्रकारे हार्दिकने हुंकार भरली, त्याने फक्त गुजरात सरकारच नव्हे तर पीएम मोदी यांचे कान देखील उभे झाले असतील. कारण त्याने या रॅलीत मोदी यांना आव्हान देत म्हटले आहे की आरक्षण नाही मिळाले तर 2017च्या निवडणुकीत कमळ खिळणार नाही.