शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (09:58 IST)

लालू यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली- नव्या जोमाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या लालूप्रसाद यादवांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लालूंना नव्याने नोटीस बजावली आहे.
 
चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात कट-कारस्थान रचल्याचे आरोप लालूंवर ठेवण्यात आले होते. मात्र, एकाच गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोनदा शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे सांगत, गेल्या वर्षी झारखंड उच्च न्यायालयाने लालूंवरील हे आरोप काढून टाकले होते.