1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. विमान तिकिटांचे दर ‘हवेत’ जाणार

विमान तिकिटांचे दर ‘हवेत’ जाणार

नव्या नागरी उड्डान धोरणानुसार विमान तिकिटांवर तिकिटावर दोन टक्के अधिभार लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याने विमानांचे दर ‘हवेत’ जाण्याची शक्यता आहे. 
 
दरम्यान, नवीन प्रस्तावित धोरणानुसार ईशान्येकडील दुर्गम भागात हवाई संपर्क वाढविण्याची शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. तसेच देशांतर्गत आणि विदेशी कंपन्यांसाठी विदेशी सेवेसंबंधीच्या नियमात बदल करण्याच्या विविध पयार्यांवरही सरकार विचार करीत आहे. या अधिभारातून मिळणार्‍या पैशाचा वापर विभागीय आणि दुर्गम भागात विमान सेवा देणाºया कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी केला जाणार आहे.