सातव्या वेतन आयोगाचा अहवाल लवकरच
नवी दिल्ली- सातव्या वेतन आयोगाचा अहवाल त्याच्या शिफारशीसह लवकरच सादर करण्यात येईल, आणि त्याचा फायदा सुमारे 48 लाख केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना लवकरच मिळेल, असे केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना सांगण्यात आले. सुमारे 55 लाख पेन्शनर्स व इतरांनादेखील यांचा लाभ होईल. हा अहवाल लवकरच केंद्री अर्थ मंत्रालयाला सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
या अगोदर येत्या ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाची मुदत आणखी महिन्यांनी वाढवून दिली होती. आणि येत्या 31 डिसेंबरपर्यत आयोगाने आपला अहवाल आपल्या शिफारशींसह केंद्र सरकारला सादर करावा, असे आयोगाला सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या प्रवक्तने दिलेल्या माहितीनुसार अहवाल शिफारशीसह तयार असून तो लवकरच संसदेत सादर करण्यात येईल, असे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.
