शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2015 (10:16 IST)

सायनाकडून पंतप्रधानांना अनोखे गिफ्ट

नवी दिल्ली- भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत वापरलेले रॅकेट तिने पंतप्रधानांना भेट म्हणून दिले. या स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारी सायना ही पहिली भारतीय ठरली होती. 
 
नरेंद्र मोदींचा आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी 65 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने सायनाने राजधानी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी सायनाने त्यांना रॅकेट भेट म्हणून दिले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
 
पंतप्रधानांनीही सायनाने दिलेल्या या गिफ्टची माहिती ट्विटरद्वारे दिली.