सुरेश प्रभूंची सेनेला सोडचिठ्ठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेणार्या सुरेश प्रभू यांनी शपथविधीच्या काहीतास आधी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती आता समोर आली आहे. शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेवून प्रभूंनी भाजपमध्ये उडी घेतल्याने सेना त्यांच्याबाबत काय भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे.
प्रभू हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यायचे असेल तर भाजपने त्यांच्या कोटय़ातून त्यांना मंत्रिपद द्यावे, असे शिवसेनेने स्पष्टपणे सांगितले होते. त्यावर भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र शिवसेनेने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर नाटय़मय घडामोडी घडल्या. शिवसेनेचा कोणीही खासदार या सोहळ्याला हजर राहिला नसला तरी सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले प्रभू हजर होते आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळे प्रभू नेमके कोणाचे?, असा प्रश्न निङ्र्काण झाला होता. या प्रश्नाचे उत्तर काही वेळातच मिळाले असून प्रभू यांनी मंत्री होण्याआधीच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले होते, असे आता स्पष्ट झाले आहे.
प्रभू यांच्यावर मोदी फिदा
सीए असलेल्या सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला. तळकोकणातील राजापूर मतदारसंघातून प्रभू यांना शिवसेनेने लोकसभेत पाठवले होते. त्यानंतर अभ्यासू व्यक्ती अशी आपली ओळख त्यांनी दिल्लीच्या राजकीय वतरुळात निङ्र्काण केली. त्याच्या जोरावरच प्रभू यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळाली होती. त्यामुळेच अशा अनुभवी चेहर्याला मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले असल्याचे बोलले जाते. प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
