1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. हिंदू लोकसंख्यावाढीचा वेग घटला

हिंदू लोकसंख्यावाढीचा वेग घटला

सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची जी धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाने मंगळवारी जारी केली असून त्यानुसार भारतात हिंदू लोकसंख्यावाढीचा वेग घटल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धमीर्यांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत अत्यल्प वाढले असल्याचे पुढे आले आहे.

सर्वच धर्मांच्या समाजामध्ये लोकसंख्या वाढीचे दशवार्षिक प्रमाण घटत असले तरी हिंदुंच्या तुलनेत मुस्लिमांमधील ही घट अधिक वेगाने होत आहे. गेल्या तीन दशकांमध्येही अशीच स्थिती होती. तसेच मुस्लिमांमधील जननप्रमाणही हिंदूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात कमी होत असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.