शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्री: घटस्थापनेचे शुभ मुहूर्त आणि लक्ष देण्यासारख्या विशेष गोष्टी

शुभ मुहूर्त

- सकाळी 6:00 ते 9:00 वाजेपर्यंत
- सकाळी 10:30 ते 12:00 वाजेपर्यंत
- सायंकाळी 4:30 ते 6:00 वाजेपर्यंत
- सायंकाळी 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत
 
जाणून घ्या कशा प्रकारे घट स्थापना करावी:
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य आहे. शेतातील काळी माती, एक पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य यामध्ये गहू, साळी, इतर कडधान्य, तसेच कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी पूजेचे साहित्य आवश्यक असते.
 
घटस्थापनेसाठी स्वच्छ जागेची निवड करावी. प्रतिपदेला सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. चौरंग किंवा पाटावर देवीची प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण, मुक्ताहराने सुशोभित करावी. फोटो नसल्यास दुर्गायंत्राची स्थापना करावी. त्यासमोर पवित्र ठिकाणची किंवा शेतातील माती आणून वेदी तयार करून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य पेरावेत. त्यामध्ये तीर्थ-जल ठेवावे. एखादे रत्न किंवा सुवर्णही त्यात ठेवावे.
 
विशेष लक्ष देण्यासारख्या गोष्टी:
 
उत्तर किंवा पूर्वीकडे तोंड करुन पूजा करावी.
दुर्गासप्शतीचा पाठ करावा.
नऊ दिवस अखंड दिवा लावावा.
पूजा झाल्यानंतर देवीसमोर मंत्रोच्चार, गायन-वादन करावे. 
या दिवसांमध्ये उत्सवात जमिनीवर झोपावे. 
कुमारिकांचे पूजन करावे. 
एक किंवा दोन वर्षाची कन्या कुमारिका, तीन वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा मानली जाते. 
दहा वर्षापहून अधिक वयाच्या कन्या पूजनासाठी वज्र्य मानले आहे. 
नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास तीन दिवस उपवास करावा.