शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

अजून वेळ गेलेली नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय

नवरात्रीच्या 9 दिवस भक्त कठिण आणि विशेष उपासना करतात. परंतू अनेकदा विधी विधान पूर्वक पूजा करणे शक्य होत नाही. असे झाले असल्यास खंत वाटून घ्यू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण 5 सोपे उपाय करून देवीला प्रसन्न करू शकता. हे सोपे उपाय करून आपण शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात. तर चला बघू या काय आहे ते उपाय:
 
पहिला उपाय
तुळशीच्या जवळपास 9 दिवे लावून देवी तुळशीला घरात शांती, सुख, समृद्धी, यश आणि सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.
 
दुसरा उपाय
लाल दुपट्यात म्हणजे चुनरी, किंवा कापडात मकाने, बत्ताशे आणि शिक्के ठेवून देवीची ओटी भरावी. आपण कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन या प्रकारे ओटी भरू शकता.
 
तिसरा उपाय
सुंदरकांड का पाठ करवणे ही योग्य ठरेल. नवरात्रीत संपण्यापूर्वी सुंदरकांड पाठ ठेवावा किंवा स्वत: सस्वर पाठ करावा.
 
चौथा उपाय
नऊ दिवस कोणतेही विधान पाळले नसतील तरी एका कुमारिकेला लाल रंगाच्या वस्तू भेट कराव्या. यात खेळणी, कपडे, शृंगार सामग्री भेट करू शकता. यासोबत फळ, मिष्टान्न दक्षिणा हे देखील देऊ शकता.
 
पाचवा उपाय
नवरात्रीच्या शेवटल्या दिवशी म्हणजे नवमीला सवाष्णला चांदीचे जोडवे, कुंकवाचे करंडे, पायातले किंवा इतर शृंगार सामग्री भेट म्हणून दिल्याने देवीची विशेष कृपा होते.