बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

एअरटेलने 76 रुपयांची रिचार्ज योजना सुरू केली

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 76 रुपयांची नवीन योजना आणली आहे. एअरटेल वापरकर्त्यांना या योजनेसह डेटा आणि टॉकटाइम देण्यात येईल. एअरटेलचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.
 
एअरटेलची नवीन फर्स्ट रिचार्ज (FRC) योजना कंपनीच्या सध्याच्या 78 रुपये, 229 रुपये, 344 रुपये, 495 रुपये आणि 559 रुपयांच्या FRC योजनेसह समाविष्ट झाली आहे. रिचार्ज केल्यावर 28 दिवसांसाठी 26 रुपयांचा टॉकटाइम आणि 100 एमबी 2 जी /3 जी /4 जी डेटा 28 दिवसांसाठी उपलब्ध असेल. 
 
लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, रिचार्ज केल्यानंतर व्हॉईस कॉलसाठी 60 पैसे प्रति मिनिट चार्ज केले जाईल. हे रिचार्ज केवळ एअरटेलच्या नवीन वापरकर्त्यांसाठी वैध असेल. नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर, एअरटेल वापरकर्त्यास My Airtel App किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज करावं लागेल.