बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:58 IST)

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची ऑफर

जिओने टेलिकॉम क्षेत्रातील पदार्पणला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्राहकांसाठी कॅशबॅक आणि मोफत डेटाची ऑफर जाहीर केली असतानाच एअरटेलनेदेखील ग्राहकांसाठी ऑफर आणली आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर जाहीर केली आहे.
 
जिओच्या प्रवेशानंतर टेलिकॉममध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. एअरटेलने आपली नवीन ऑफर झाली केली असून 419 रुपयांमध्ये 1.4 जीबी डेटा प्रतिदिन देण्यात येणार आहे. याआधी एअरटेलकडून ग्राहकांसाठी 399 आणि 448 रुपयांच्या रिचार्जवर ऑफर सुरू आहे. एअरटेलचा 419 रुपयांचा रिचार्ज पॅक अ‍ॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा पॅक 75 दिवस वैध असणार आहे. या मध्ये अनलिटिेड लोकल, एसटीडी कॉल मिळणार आहेत. त्याशिवाय देशभरात मोफत रोमिंग आणि 100 एसएमएस मिळणार असून एअर टीव्हीदेखील या रिचार्जमध्ये ळिणार आहे.
 
जिओच्या 349 रुपयांच्या रिचार्जमध्ये 70 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिवस 1.5 जीबी डेटा मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात.