गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

... म्हणून गणपतीला वाहत नाही तुळस

गणतीला तुळस न वाहण्याचे कारण आहे तरी काय? जाणून घ्या पौराणिक कारण:
 
एकदा धर्मराजाची अती सुंदर पुत्री तुळस गंगा नदीच्या काठावर पूजा करत होती. तेव्हा तिला तिला ध्यानात मग्न असलेला सुंदर गणपती दिसला. गणपती ध्यानस्थ असल्यामुळे त्याच्या तेजाने तुळस प्रभावित झाली आणि तिने त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी हाका मारल्या. ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. त्याने ध्यान भंग करण्याचे कारण विचारले तेव्हा तुळस म्हणाली मला तू फार आवडला आहेस. मला तुझ्याशी विवाह करायचा आहेस. त्यावर गणपतीने मी ब्रह्मचर्याच्या मार्गावर असल्याने कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही असे म्हटले. गणेशाचा नकार ऐकून तुळशीला अपमान झाल्यासारखे वाटू लागले आणि भावना दुखावल्या गेल्या म्हणून तिने गणपतीला शाप दिला की एक दिवस तुझा नक्की विवाह होईल. यावर गणपतीने तिला प्रतिशाप दिला, तुझा विवाह एका राक्षसाबरोबर होईल. गणपतीचा शाप ऐकून तुळशीला आपली चूक जाणवली आणि तिने माफी मागितली. तेव्हा गणपती म्हणाला, की कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील. तुला एक पवित्र औषधी वनस्पती म्हणून स्थान मिळेल. परंतू माझ्याशी निगडित कोणत्याही पूजेअर्चेत तुझा वापर मान्य नसेल. नंतर शापामुळे शंखचूदा राक्षसाची त्या सुंदर अप्सरा म्हणजे तुळस हिचे विवाह झाले आणि भगवान शंकरांनी त्याचा वध केला होता.
 
गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वाहत नाहीत.