शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , मंगळवार, 30 जुलै 2019 (10:45 IST)

तुलसी गबार्ड यांनी गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस बजावली

2020 च्या निवडणूक प्रचारादरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून तसेच सहा तासांसाठी त्यांचे प्रचाराचे अकाउंट बंद केल्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर प्रचारावर परिणाम झाला असा आरोप करत अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस बजावली आहे.

38 वर्षाच्या तुलसी गबार्ड या डोनाल्ड ट्रम्प विरोधात 2020ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या प्रचार करत आहेत. 27 आणि 28 जूनदरम्यान सहा तासांसाठी त्यांचे प्रचाराचे अकाऊंट बंद करण्यात आले होते. यामुळे जाहिराती मिळवण्यास आणि मतदात्यांपर्यंत पोहोचण्यास गबार्ड यांना अडचण आली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवणाऱ्या गबार्ड या पहिल्या हिंदू उमेदवार आहेत.