रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2019 (08:51 IST)

गुगलचे तुमच्या वर लक्ष हे सोप्पे उपाय करा

प्रत्येकजण आपला अधिक वेळ सोशल वेबसाईट आणि ब्राऊझिंगमध्ये घालवतात. पण यामुळे युजर्ससाठी धोका वाढत असल्याचे समोर आलं आहे. तुम्ही इंटरनेटवर अधिक वेळ घालवत असल्यामुळे तुमची प्रत्येक माहिती गुगलला मिळत आहे. गुगलची प्रत्येक युजर्सवर पाळत आहे. गुगलकडून तुमची सर्व माहिती इतर छोट्या-मोठ्या कंपनींना विकली जात असल्याचा आरोपही केला जातो. त्यामुळे सुरक्षा म्हणून काही गोष्टी करणे गरजेचे आहे. या पासून स्वत:चे सरंक्षण कसे करता येईल याचा सल्ला आम्ही तुम्हाला देणार आहोत. यामध्ये सात गोष्टी आहेत त्या जर केल्या तर गुगल तुमच्यावर लक्ष ठेवू शकणार नाही. अश्या आहेत त्या गोष्टी.
 
ईमेल ट्रॅकिंग ब्लॉक करा, लोकेशन ट्रॅकिंग बंद करा, व्हॉईस रेकॉर्डिंग हटवा, पर्चेस हिस्ट्री डिलीट करा, गुगल सर्च सोडा, टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन ऑन करा, गुगलकडून आपला डेटा विकला जातो. यासाठी तुम्ही तुमचा डेटा लपवू शकता. यासाठी तुम्ही aboutme.google.com वर जावा. येथे तुम्हाला तुमच्याबद्दल दिसत असलेल्या वेगवेगळ्या माहितीवर आणि सेटिंगने ‘Hidden from other users सिलेक्ट करा त्यामुळे तुमच्यावर आता गुगल तुमच्यावर लक्ष ठवू शकणार नाही.