रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (13:50 IST)

नोकियाचा सर्वात स्वस्त फोन

HMD Global ने आपला नवीन फोन Nokia C12 भारतात लॉन्च केला आहे. Nokia C12 हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे आणि नोकियाच्या C सीरीजचा नवीन सदस्य आहे. Nokia C12 सह व्हर्च्युअल रॅम पण देण्यात आली आहे. ज्यांना चांगला लुक हवा आहे आणि कमी किमतीत Android फोन स्टॉक करायचा आहे त्यांच्यासाठी Nokia C12 सादर करण्यात आला आहे. Nokia C12 मध्ये सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Nokia C12 मध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Nokia C12 च्या कॅमेरासोबत पोर्ट्रेट आणि विशेषत: नाईट मोड देण्यात आला आहे.
 
Nokia C12 मध्ये 6.3-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या Nokia फोनमध्ये AndroidTM 12 (Go Edition) आहे, जो 20 टक्के अधिक मोफत स्टोरेजचा दावा करतो. यासोबतच 2 GB व्हर्चुअल रॅम देखील उपलब्ध आहे.नोकियाच्या या फोनमध्ये Unisoc 9863A1 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.
 
कनेक्टिव्हिटीसाठी, या Nokia फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रो USB, WiFi: 802.11 b/g/n, वायरलेस रेडिओ आणि वायर रेडिओ दोन्ही आहेत. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी आहे जी फोन मधून काढता येते.
 
Nokia C12 चा सेल भारतात सुरु झाला आहे. Nokia C12 च्या 2 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा फोन डार्क शिऑन आणि लाइट मिंट कलरमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत हा फोन 17 मार्चपर्यंतच खरेदी करता येईल, म्हणजेच ही लॉन्चिंग किंमत आहे.
Edited by : Smita Joshi