शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

स्वस्त स्मार्टफोन देणार्‍या फ्रिडम 251 च्या संचालकाला अटक

देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणार्‍या संचालकास अटक करण्यात आले आहे. संचालकास अटक झाल्याने फ्रिडम 251 हा स्वस्त स्मार्टफोन बनवणारी कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे. रिंगिंग बेल या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पैसे घेऊन फोन न दिल्याचा या कंपनीवर आरोप आहे.
 
गाझियाबादच्या सिंहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये रिंगिंग बेल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने व्यवसायिकांशी स्वस्त मोबाईल देण्याचा करार केला. मात्र फोनही नाही आणि पैसेही मिळाले नसल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांना ताब्यात घेतले आहे. वितरकांशी पैशांसंबंधित बोलणे झाले आहे आणि लवकरच पैसे परत दिले जातील, असे आश्‍वासन गोयल यांनी दिले आहे. 251 रुपयात सर्वात स्वस्त स्मार्टफोन देऊ असे म्हणत ही कंपनी जोरदार चर्चेत आली होती. कंपनीच्या वेबसाईटवरुन साडे सात कोटी ग्राहकांनी फोनची बुकिंग केली होती. पण सध्या ही कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे.