बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:13 IST)

अबब, 249 रुपयांत फिचर फोन

भारतीय मोबाईल ग्राहकांसाठी ई-कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज (www.shopclues.com)वर 249 रुपयांत फिचर फोन लॉन्च करण्यात आला आहे.  iKall K71 (आयकॉल के71) हा फिचर फोन अवघ्या 249 रुपयांत ग्राहकांना मिळत आहे. मात्र, या फोनची ही किंमत एका ठराविक काळासाठीच आहे.
iKall K71 (आयकॉल के71) या फिचरफोनमध्ये सिंगल सिमकार्ड असणार आहे. यामध्ये 800 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. फोनला 1.4 इंचाचा मोनोक्रोम डिस्प्ले आणि एफएण रेडिओ, टॉर्च सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन ४ तासांचा टॉकटाईम देतो आणि याचा स्टँडबाय टाईम २४ तासांचा आहे.कंपनीने सांगितले की, iKall K71 (आयकॉल के71) हा फोन देशातील टियर 3 आणि टियर 4 शहरांत राहणाऱ्या ग्राहकांना लक्षात ठेवून लॉन्च करण्यात आला आहे.