शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:40 IST)

जगातील सर्वात छोटा फोन सादर, 'जेनको टिनी टी1'

जेनको (Zanco)या कंपनीने जगातील सर्वात छोटा फोन सादर केला आहे. हा फोन चक्क आपल्या अंगठ्याएवढा आहे. तो तुमच्या मुठीत सहज राहील. हा फोन फक्त लहान नाही तर पातळ देखील आहे. दोन रूपयाचे नाणे देखील या फोनपेक्षा जाड असेल. हा स्मार्टफोन १.८२ इंचाचा आहे. याचे वजन १३ ग्रॅम आणि लांबी २१ एमएम आहे. यात फुल्ली फंक्सनल किबोर्ड आणि स्पीकर आहेत. 

हा  फोन २ जी नेटवर्कवर काम करेल. हा एक प्रकारचा टॉक अंण्ड टेक्स्ट मोबाईल आहे. यात कोणत्याही प्रकारची इंटरनेट कनेक्टिविटीची सुविधा नाही.याची बॅटरी जबरदस्त आहे. बॅटरीत ३ दिवसांचा स्टॅंडबाय बॅकअप आणि १८० मिनीटांचा टॉक टाईम आहे. यात देखील स्मार्टफोनप्रमाणे नॅनो सिम वापरावे लागेल.

 

या स्मार्टफोनमध्ये तुम्ही ३०० लोकांचा नंबर सेव्ह करू शकता. यात ५० हुन अधिक मेसेज स्टोर केले जातील. त्याचबरोबर फोनमध्ये ३२ जीबी रॅम आणि ३२ जीबी रोम आहे. तसंच मायक्रो USB चार्जर देखील देण्यात आला आहे. या फोनची किंमत ३० युरो म्हणजेच सुमारे २,२८० रुपये आहे. येत्या  मे २०१८ पासून त्याला सुरूवात होईल.