1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
  4. /jio-is-offering-20-percent-extra-4g-data-on-lyf-smartphones

Lyf स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी जिओची शक्कल

रिलायन्स जिओनं Lyf ब्रॅण्डचा स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी ही रिलायन्सनं नवी ऑफर लाँच केली आहे. यात  Lyf ब्रॅण्डचा कोणताही नवा स्मार्टफोन  खरेदीवर  जिओकडून अतिरिक्त 20 टक्के 4जी डेटा मोफत मिळणार आहे. ही ऑफर Lyfच्या अर्थ 1, अर्थ 2, वॉटर 1, वॉटर 7S, वॉटर 8, वॉटर 10, वॉटर 11, वॉटर F1, F1S आणि विंड 4S या 10 स्मार्टफोनवर मिळणार आहे. पण ज्यांनी जिओ प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी केली आहे त्यांनाच ही ऑफर आहे. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्याच्या सिम स्लॉटमध्ये जिओचं सिम टाकल्यानंतर 48 तासाने यूजर्सला अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला 309 किंवा 509 रुपये किंमतीचा प्लान घ्यावा लागेल. 309 रुपयांच्या प्लानमध्ये 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांच्या प्लानमध्ये 12 जीबी डेटा अतिरिक्त मिळणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत सहा रिचार्जवरच मिळणार आहे.

पुढील लेख
तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर गजराजची पाठवणी