मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

मायक्रोमॅक्स स्पार्क गो: यात आहे अँड्रॉइड ओरियो

घरगुती स्मार्टफोन निर्माता, मायक्रोमॅक्सने आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन स्पार्क गो लॉच केला आहे. मायक्रोमॅक्स स्पार्क गो डिव्हाईस फ्लिपकार्टच्या भागीदारीत सुरू केले गेले आहे. रिलायन्स जिओ ग्राहक जर मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनची खरेदी करतात, तर त्यांना अतिरिक्त डेटाचा फायदा होईल. स्पार्क गो गुगलच्या अँड्रॉइड ओरियो (गो संस्करण) चा भाग आहे. एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी वेगवान ओएस अद्यतन जारी करण्यासाठी गूगलने ही आवृत्ती जारी केली आहे.
 
मायक्रोमॅक्स स्पार्क गो किंमत आणि उपलब्धता 
मायक्रोमॅक्स स्पार्क गो ची किंमत 3,999 रुपये ठेवली गेली आहे. हे 26 ऑक्टोबरपासून ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. रिलायन्स जिओच्या भागीदारीमुळे ग्राहकांना हा मायक्रोमॅक्स फोन विकत घेताना 25 जीबी 4 जी डेटा मिळेल. 198 किंवा 299 रुपयेच्या 5 रिचार्जवर 5 जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध होईल.
 
मायक्रोमॅक्स स्पार्क गो तपशील
तपशील बद्दल सांगायचे तर मायक्रोमॅक्स स्पार्क गोमध्ये 5-इंच एफडब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले आहे. ज्याचे 480x854 पिक्सेलचे रिझोल्यूशन आहे. फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनचा स्टोरेज 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. 2000 एमएएच बॅटरी स्मार्टफोनला देण्यात आली आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा व 2 मेगापिक्सेल फ्रंट सेन्सर आहे.