सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (22:18 IST)

Motorola Razr 2019 : 8 मे रोजी विक्रीसाठी उपलब्ध

फ्लिपकार्ट वेबसाइटनुसार Motorola Razr 2019 स्मार्टफोन  शुक्रवारी ८ मे रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Motorola Razr 2019 फोन खरेदी करायचा असल्यास फ्लिपकार्टवर १०,००० रुपयांचे कॅशबॅक देखील दिलं जात आहे. तथापि, ही ऑफर केवळ सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डसाठी लागू असेल. हँडसेट सध्या प्री-ऑर्डर पर्यायासह फ्लिपकार्टवर उपबद्ध आहे.
 
प्री-ऑर्डरसह दिलं जाणारे १०,००० रुपये कॅशबॅक विक्री सुरू झाल्यानंतरही सुरू राहील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ई-कॉमर्स वेबसाइटने माहिती दिली आहे की कोरोना महामारीमुळे ओल्ड प्रॉडक्ट एक्सचेंजचा पर्याय उपलब्ध केलेला नाही. तथापि, दरमहा ५,२०९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर नो कॉस्ट ईएमआय पर्याय आहे. Motorola Razr 2019 ची किंमत भारतात १,२४,९९९ रुपये आहे. लॉकडाऊन ३.० मध्ये केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विना-आवश्यक वस्तू वितरीत करण्यास परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत हे डिव्हाइस सध्या रेड झोनसाठी उपलब्ध नाही.