1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

नोकियाचा 3310 पुन्हा बाजारात येणार

नोकियाचा 3310 हा फोन पुन्हा बाजारात येत आहे. दमदार बॅटरी बॅकअपसाठी प्रसिद्ध असलेला हा फोन 4 हजार रुपयांमध्ये रिलाँच केला जाऊ शकतो अशी माहिती आहे. 
 
17 वर्षांपूर्वी हा फोन 2 हजार रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचा बॅटरी बॅकअप चांगला आहे. त्यामुळे युझर्सना हा फोन सेकंडरी फोन म्हणून वापरता यावा, यासाठी कंपनीने हा फोन पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. एचएमडी ग्लोबल ही फिनलँडची कंपनी हा फोन लाँच करणार असून नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये नोकिया 6 हा फोन लाँच केला असून हा फोन अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.