शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्होडाफोनकडून 'सुपर डे'चा प्लॅन

व्होडाफोनने अवघ्या 19 रुपयांत अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा एक प्लॅन आणला आहे. या प्लॅनअंतर्गत दरदिवशी 4G स्पीडचा 100 एमबी डेटा मिळणार आहे. व्होडाफोननं सुपर डेनंतर आणखीही दोन प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत.

पहिला 19 रुपयांचा प्लॅन हा एका दिवसापुरता मर्यादित आहे. तर दुसरा आणि तिसरा प्लॉन अनुक्रमे 49 आणि 89 रुपयांचा आहे. या ऑफरचं नाव सुपर वीक असून, याची वैधता आठवड्याभराची आहे. एक दिवसाच्या 19 रुपयांच्या रिचार्जवर व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड आहे. यासोबत 100 जीबी 4G डेटाही फ्री मिळणार आहे.

ही ऑफर 4जी हँडसेट वापरकर्त्यांसाठी आहे. 49 रुपयांच्या पॅकची वैधता 7 दिवसांची आहे. यात तुम्हाला 7 दिवसांपर्यंत व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल आणि एसटीडी कॉलिंग अनलिमिटेड मोफत मिळणार आहे. तसेच याबरोबरच दिवसाला तुम्हाला 250 एमबी 4जी डेटा फ्री मिळणार आहे. तर 89 रुपयांच्या ऑफरची वैधताही 7 दिवसांचीच आहे.