1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (16:39 IST)

महिला टेबल टेनिस संघाचा रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Paris olympics 2024
श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने चौथ्या मानांकित रोमानियाचा 3-2 असा पराभव करून प्रथमच सांघिक स्पर्धेच्या अंतिम आठ फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्या सामन्यात मनिकाने एडिना डियाकानूचा 3-0 असा पराभव केल्याने भारतीय महिला संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला. 
 
भारतीय महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाच्या टेबल टेनिस संघाचा पराभव केला आहे. त्यांनी हा सामना 3-2 अशा फरकाने जिंकला. हा सामना 16व्या राउंडचा म्हणजेच प्री क्वार्टर फायनलचा होता. हा सामना जिंकून टीम इंडिया आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे.
Edited by - Priya Dixit