बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. ऑस्कर
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2018 (09:07 IST)

ऑस्कर पुरस्कार : 'द शेप ऑफ वॉटर' ला 13 नामांकन

ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकनासाठी घोषणा करण्यात आली.यात  द शेप ऑफ वॉटर या सिनेमाला 13 नामांकन मिळाली आहेत तर थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड इबिंग, मिसोरी, डंकर्क हे सिनेमेही यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत.यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मेरिल स्ट्रीपला यंदा 21वं नॉमिनेशन्स मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वाधिक नामांकन मिळालेली मेरिल स्ट्रीप पहिली अभिनेत्री ठरलीये..4 मार्च रोजी अमेरीकेमधील लॉस इंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे..त्यामुळे आता कोणता सिनेमा या पुरस्कार सोहळ्यांमध्ये बाजी मारतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.