चीनने मुशर्रफ यांच्यावर उधळली स्तुतिसुमने
मुशर्रफ यांच्या काळात उभय देशांचे संबंध आणखी सुधारल्याचे स्पष्ट करत चीनने मुशर्रफ यांच्यावर स्तुती सुमनांची उधळणं केली आहे. मुशर्रफ यांनी आशियाई देशांच्या शांततेसाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे मत चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते कीन गांग यांनी व्यक्त केले आहे. पाकमधील राजकीय घडामोडींना वेग आल्याने आणि आपल्या विरोधात महाभियोग दाखल करण्याच्या तयारींना वेग आल्याने मुशर्रफ यांनी आपला चीन दौरा रद्द केला होता. यानंतर चीनने आता त्यांची स्तुती केली असून मुशर्रफ यांच्या मुळे पाकिस्तान आणि चीन आणखी जवळ आल्याचे गांग यांनी स्पष्ट केले आहे.