बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (10:02 IST)

चाणक्य नीती : यशाचे मंत्र

चाणक्य नितीमध्ये आपल्याला यशाचे मंत्र सापडतात. आचार्य चाणक्यने रचलेले नीती शास्त्र अतिशय लोकप्रिय असे साहित्य आहेत. या मध्ये चाणक्याने नीतिरूपात असे सूत्र सांगितले आहे. ज्यामुळे आपल्या वास्तविक आयुष्याला यशस्वी करता येत. चाणक्य नीतिशास्त्रानुसार ज्या लोकांमध्ये हे 4 गुण असतात ते आपल्या आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाही. हे चार गुण खालील प्रमाणे आहेत.

1 जे नेहमी सकारात्मक विचार करतात : 
माणसाची सकारात्मक विचारसरणी माणसाला भल्या मोठ्या आव्हानांना सहजपणे हरविण्यास सक्षम असते. आचार्य चाणक्याच्या मते, जो माणूस कधीही विषम परिस्थितीमध्ये आलेल्या संकटाना घाबरून बसून जातो तो आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. परंतु एखादा सकारात्मक विचारसरणी ठेवणारा माणूस परिस्थितीला मात देऊन त्यावर विजय मिळवतो आणि यशाला प्राप्त करतो.    
 
2 जे लोकं मेहनती असतात : 
असे म्हणतात की आपल्या नशिबात सगळे काही लिहिलेले आहेत. पण कष्ट करणारे आपल्या कष्टाच्या बळावर आपले नशीब घडवतात. आचार्य चाणक्यानुसार जो माणूस यशाचे शिखर गाठतो तो कष्टकरी असतो. एक यशस्वी माणूस कधीही कष्टाला मागे राहत नाही. जे नशिबावर अवलंबून असतात त्यांना कधीही यश मिळत नाही.   
 
3 जे नेहमीच सक्रिय असतात : 
आळशीपणा माणसाला यशापासून फार लांब ठेवतो. सक्रिय असणारा माणूस आपल्या कार्यासाठी दक्षता दाखवतो. सक्रिय असणारा मनुष्य यशाच्या पायऱ्या नेहमीच चढत असतो. तो यशाची उंची गाठतो. आपल्याला देखील आयुष्यात यश गाठायचे असल्यास आपण देखील आपल्या क्षेत्रात सक्रिय राहणं फार महत्वाचं आहे.
 
4 जे नात्यांना बळकट करतात : 
आपल्या कार्यक्षेत्रात सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणे स्वतःमध्येच एक विलक्षण कला आहे. प्रत्येकाकडे अशी कला नसते. पण ज्यांच्याकडे ही असते त्याला यशस्वी मानलं जातं. आचार्य चाणक्यांच्या मतानुसार आपण ज्या क्षेत्रात आपले कार्य करीत आहात आणि आपल्याला तिथे आपले पाय रुतवायचे असल्यास आपल्याला त्या क्षेत्राच्या लोकांशी सलोख्याचे संबंध बनवायला हवं.