शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (21:36 IST)

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

hanuman sanjeevani booti
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे हनुमानजी कडूनच शिकावं. ज्ञान, बुद्धी, शिक्षा आणि सामर्थ्यासह त्यांच्यामध्ये नम्रता देखील अफाट होती. योग्य वेळी योग्य काम करणं आणि त्या कामाला व्यवस्थितरीत्या पार पाडण्याचा चमत्कारिक गुण त्यांच्या मध्ये होता. चला जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये कार्य संपादित करण्याची अद्भुत क्षमता होती आणि आजच्या व्यवस्थापक आणि कष्टकरी लोकांनी ते शिकले पाहिजे.
 
1 शिकण्याची आवड -
हनुमानाने बालपणापासून शेवट पर्यंत प्रत्येकाकडून काही न काही शिकले होते. असं म्हणतात की त्यांनी आपल्या आई अंजनी आणि वडील केसरी यांच्या बरोबरच आपल्या धर्मपिता पवनपुत्र यांच्या कडून देखील शिक्षणाचे धडे घेतले होते. त्यांनी शबरीचे गुरु ऋषी मतंग यांच्या कडून देखील शिक्षणाचे धडे घेतले होते. तसेच भगवान सूर्याकडून देखील सर्व प्रकाराचे ज्ञान मिळवले.
 
2 कार्यकौशल्य आणि कामात प्राविण्यता - 
हनुमानाची काम करण्याची पद्धत अनन्य होती. ते कामात दक्ष आणि प्राविण्य होते. त्यांनी सुग्रीवाची मदत करण्यासाठी श्रीरामाशी त्यांची भेट घडवून आणली होती. तसेच प्रभू श्रीराम यांची मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून प्रभू श्रीरामाने जी आज्ञा केली त्या प्रमाणे त्यांनी काम केले. ते आपल्या कार्यात कुशल व्यवस्थापक असून सैन्यापासून समुद्राच्या पलीकडे जाण्यापर्यंतची सर्व कार्ये कौशल्य आणि बुद्धिमत्तेने केले हेच गुण त्यांच्या विशेष व्यवस्थापनाला दर्शवते.
 
3 योग्य नियोजन, मूल्य आणि वचनबद्धता - 
हनुमानजींना जे काम देण्यात येत होते ते काम करण्याच्या पूर्वी त्याची योजना बनवायचे आणि मग त्याला कार्यान्वित करत असे. जसे की श्रीरामाने हनुमानजींना लंकेला पाठविताना सांगितले होते की ही अंगठी सीतेला दाखवून सांगा की श्रीराम लवकरच येतील. पण हनुमानजींना हे माहीत होत की समुद्र ओलांडताना काही न काही अडचणी येतील आणि लंकेत शिरकाव करताना देखील काय अडचणी येऊ शकतात हे देखील त्यांना माहीत होते. त्यांनी कठोर शब्दात रावणाला श्रीरामाचा निरोप दिला, विभीषणांना श्रीरामाकडे घेऊन आले, अक्षयकुमार याला ठार मारले आणि माता सीतेला अंगठी देऊन लंकेला पेटवले आणि त्यामधून सुखरूप परत आले. हे सर्व त्यांच्या कार्याचा एक भागच होता. बुद्धीने योग्य कार्य योजना करण्याची त्यांच्या मध्ये एक योग्यता असे. हनुमानचे व्यवस्थापन क्षेत्र अत्यंत विस्तृत, अद्वितीय आणि योजनेचे मुख्य नियोजक म्हणून ओळखले जाते. हनुमानजींचे आदर्श सांगतात की समर्पण, वचनबद्धता आणि निष्ठेने प्रत्येक अडचणीवर मात केली जाऊ शकते. जीवनात या मूल्यांचे महत्त्व कमी होत नाही. लंका पोहोचण्यापूर्वी त्यांनी एक रणनीती बनविली. लंकेत असुरांच्या गर्दीमध्ये देखील विभीषण सारखे गृहस्थ शोधले. त्यांच्याशी मैत्री केली आणि माता सीताला शोधून काढले. लंकेच्या लोकांना भीती दाखविण्यासाठी लंकेला पेटवले. विभीषणांची प्रभू श्रीरामाशी भेट घडवून आणून दिली. अशा प्रकारे संपूर्ण व्यवस्थापनासह आपल्या कार्याला पार पाडले.
 
4 दूरदृष्टी -
ही हनुमानजींची दूरदृष्टीचं होती की त्यांनी आपल्या सोप्या आणि सौम्य बोलण्याच्या गुणामुळे कपिराज सुग्रीव आणि श्रीरामाची मैत्री करविली. तसेच त्यांनी विभीषण आणि प्रभू श्रीरामाची मैत्री करविली. सुग्रीवने श्रीरामाच्या मदतीने बालीला ठार मारले तर श्रीरामाने विभीषणाच्या मदतीने रावणाला ठार मारले. हनुमानाच्या कौशल्यते आणि हुशारीने हे शक्य झाले.
 
5 धोरणात्मक कार्य क्षमता -
बालीला श्रीरामाच्या मदतीने ठार मारल्यावर सुग्रीव राजा बनला. त्याच्याकडे संपत्ती आणि पर स्त्री आल्यावर तो राजसुखात रमून बसला आणि त्याला प्रभू श्रीरामाला दिलेल्या वचनाचा विसर पडला. त्यांनी श्रीरामाची साथ सोडली. पण हनुमानजीने सुग्रीवला साम, दाम, दंड आणि भेद या चारही पद्धतीचा वापर करून त्याला श्रीरामाला दिलेल्या वचनाची आणि त्याच्या कार्याची आठवण करून दिली आणि विसर पडलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. या शिवाय अनेक असे प्रसंग होते ज्यासाठी हनुमानाने धोरणाने काम केले. हनुमानजी व्यवस्थापनेची शिकवण देतात आणि सांगतात की जर लक्ष मोठे असेल आणि सर्वांच्या हिताचे असेल तर सर्व प्रकाराचे धोरण अवलंबवले जाऊ शकतात.
 
6 धाडस - 
हनुमानात खूप धाडस असून ते कोणत्याही प्रकाराच्या विषम परिस्थितीला न घाबरता आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर पुढे वाढले. रावणाला शिकवण देण्यात त्यांच्या मध्ये शौर्य, दृढ निश्चय, स्पष्टता आणि निवांतपणा दिसून येतो. त्यांच्या व्यवहारात खोटेपणा किंवा छळ कपट नाही. त्यांच्या वागण्यात देखील पारदर्शकता दिसून येते कुटीलपणा नाही. त्यांच्या मध्ये आपली गोष्ट दुसऱ्यांना सांगण्याचे कौशल्य असून त्यांच्या बुद्धी मत्तेची, कौशल्य आणि धोरणाने वागण्याची स्तुती तर रावण देखील करायचा.
 
7 नेतृत्व - 
हनुमान प्रभू श्रीरामाची आज्ञा पाळायचे पण ते वानरांचे प्रमुख होते. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या त्यांच्या क्षमतेला प्रभू श्रीरामाने ओळखले होते. जो कठीण परिस्थिती मध्ये न घाबरता आणि धैर्याने आपल्या साथीदारांची मदत आणि मार्गदर्शन करू शकेल आणि ज्याच्या मध्ये सामर्थ्य, उत्साह, चिकाटी आणि परिस्थितीवर किंवा अडचणीवर मात करण्याचा संकल्प आणि सर्वांची मते घेण्याचे आणि ऐकण्याचे गुण असतात तेच त्या गटाचे नेते किंवा प्रमुख असू शकतात. त्यांनी जांबवंतांकडून मार्गदर्शन घेतले आणि उत्साहाने रामाचे काम केले. सर्वांचा मान राखणे, सक्रिय आणि उत्साही राहून कामात सातत्यता राखण्याची क्षमता देखील कर्तृत्वाचा सिद्ध मंत्र आहे.
 
8 प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणं -
हनुमानाच्या चेहऱ्यावर कधीही काळजी, नैराश्य किंवा दुःख दिसत नव्हते ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायचे. हनुमान कधीही काम करताना गंभीर नसायचे त्यांनी प्रत्येक कार्य करताना त्याला एका खेळा प्रमाणेच घेतले. त्यांच्यामध्ये असलेले हे गुण अनिवार्य व्यवस्थापन गुणवत्तेचे आहे. त्यांची विनोदी वृत्ती त्यांना प्रत्येक परिस्थितीत बनवून ठेवते. लंकेला गेलेले असताना त्यांनी मस्तीने बरीच फळे तोडली आणि बागेची नासधूस करून आनंदी झाले होते आणि तसेच त्यांनी रावणाला अशा पद्धतीने निरोप देखील दिला. अशा प्रकारेच त्यांनी द्वारकेला जाऊन देखील बागेतील फळे खाऊन स्वतःचे मनोरंजन देखील केले होते आणि शेवटी बलरामाचे गर्वहरण केले. त्यांनी गमतीत सहजपणे अनेक अभिमानी राजांचे अभिमान मोडले.
 
9 शत्रूंवर दृष्टी - 
हनुमान कोणत्याही परिस्थितीत असो भजन करतात किंवा फळ आणि फुलांचा आस्वाद घेत असल्यास किंवा अवकाशात फिरत असल्यास त्यांची दृष्टी आपल्या शत्रूंवर असे. शत्रूंचे बेसावध असताना त्यांच्या गुपित रहस्यांना जाणून घेणं शत्रूंच्या मध्ये मित्राला म्हणजेच विभीषणाला शोधण्याची क्षमता विभीषण प्रसंगात दिसून येते. त्यांच्या प्रत्येक कामात विचार करून कृती करण्याचे आश्चर्यकारक संयोजन आहे.
 
10 नम्रता- 
हनुमान थोरवंत सर्व शक्तिमान होते. रावणाच्या लंकेचा विध्वंस केला, असुरांना ठार मारले, शनिदेवाचे गर्वहरण केले, पौंड्रकची नगरीला उद्ध्वस्त केले. अर्जुन, भीम आणि बलरामाचे गर्व हरण केले आणि साऱ्या जगाला हे सांगितले की ते कोण असे. पण त्यांनी स्वतः कधीही दयाळूपण आणि भक्तीची साथ सोडली नाही. रावणाशी देखील नम्रतेने वागले. तर अर्जुनाशी देखील नम्रतेने वागून बोलले पण जेव्हा अर्जुन काहीच समजून घ्यायला तयार झाले नाही, तेव्हा प्रभूच्या आज्ञे वरून आपले सामर्थ्य दाखविले. 
 
जर आपण देखील कार्यसंघ करीत असाल किंवा नसाल तरीही एक व्यवस्थापक म्हणून विनम्र असणं महत्त्वाच आहे. नाही तर व्यवस्थापकाला गर्व झाले आहेत असं समजावं. पण व्यवस्थापकाला हे समजायला पाहिजे की त्याचे हे गर्व क्षणिकच आहे.