बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (14:21 IST)

यशासाठी हवी सावधगिरी

प्रत्येक जण कामाच्या ठिकाणी यश मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र आपल्या हातून अशा काही चुका घडतात की, कालांतराने आपल्या पदरात नुकसान पडू शकते. यश मिळवण्यासाठी वाटचालकरताना आपण चुकांत सुधारणा करायला हवी आणि अशा चुकांपासून सावध राहिले पाहिजे. 
 
विनंती झुगारू नकाः कामाच्या ठिकाणी जर एखादा सहकारी आपली मदत मागत असेल तर आपण पुढाकार घेऊन त्याला मदत करा. आपण व्यग्र असल्याचे कारण सांगू नका. जर आपण मदत केली नाही तर आपल्यालाही गरजेच्या वेळी मदत करणार नाही. अशा रितीने आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते.
 
एकट्याने भोजन नकोः जेवणाच्या वेळेचा उपयोग हा सदुपयोगासाठी करावा. यावेळी सहकार्‍यांशी अनौपचारिक संवाद वाढतो. अनेकदा जेवणाच्या वेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती कळते. यातून आपल्याला बेस्ट टिम्सशी जोडण्याचे आणि पुढे जाण्याची संधी मिळते. 
 
वरिष्ठांना टाळू नकाः वर्कप्लेसवर यश मिळवण्यासाठी आपण बॉसला कधीही टाळू नये. वरिष्ठांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. कामाच्या ठिकाणी अधिकाधिक आऊटपूट देण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह पद्धतीने चांगले परिणाम द्या .
 
अपेक्षा बाळगू नकाः कामाच्या ठिकाणी व्यावसायिक रितीने काम करणे गरजेचे आहे. कोणताही सहकारी आपल्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध नसतो.आपल्याला प्रत्येक व्यक्तीबरोबर काम करायचे असते. कोणाकडूनही भावनिक अपेक्षा बाळगू नका. यामुळे आपण ध्येयापासून भरकटत जाल आणि यशापासून वंचित राहाल.
 
अपर्णा देवकर