सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (20:11 IST)

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून

उन्हाळाच्या काळात जेव्हा सूर्याच्या किरण प्रचंड तापतात जणू आगच बाहेर पडते तेव्हा पृथ्वीच्या तापमानात वाढ होऊ लागते. अश्या परिस्थितीत वातावरण देखील गरम होतं. 
 
अश्या वातावरणात आपल्या शरीराचे तापमान सामान्यांपेक्षा जास्त वाढू लागतं. बऱ्याच वेळा हे तापमान 102 डिग्री फॅरेनहाईट पासून 100 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहचंत. 
 
अशावेळी घाबरणे, अर्ध चेतना येणे, डोळ्याच्या पुढे अंधारी येणे, नाडीची गती मंद होणे असे त्रास उद्भवू लागतात. या अवस्थेत शरीराला उन्हाळ्याची लू धरून ठेवते. 
 
तसे आपल्या मेंदूत तापमान नियंत्रण कक्ष देखील असतं जे शरीराच्या तापमानाला नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. हे आपल्या शरीराला वातावरणानुसार थंड किंवा गरम ठेवतं. पण अश्या स्थितीत तळहात आणि तळपायात जळजळ होऊ लागते. डोळे देखील लालसर होऊन जळजळ करतात. पुन्हा पुन्हा तहान लागते. 
 
आपल्या शरीरांवर उष्णतेची लू का जाणवते ?  याची अनेक कारणे आहेत, जसे शरीरात पाण्याची कमतरता, शरीरातील मीठेचे प्रमाण एकाएकी कमी होणं, उन्हात सतत काम करणे, घरातून उपाशी निघून उन्हात फिरणे, उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे.
 
उपचार म्हणून या दिवसात भरपूर पाणी प्यावे. शक्योत्तर दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे टाळावे. पडावे लागलेच तर हात-पाय, चेहरा सर्व झाकून निघावे. उन्हाचा चष्मा वापरावा. तसेच उन्हातून लगेच एकदम थंड जागेवर जाणे टाळावे. गार पाणी पिण्यापेक्षा मातीच्या घड्यातील पाणी प्यावे. चक्कर वाटत असल्यास एनर्जी ड्रिंक घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी कांदा किसून तळहात आणि तळपायावर लावावा. याने आराम मिळतो.