सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (22:16 IST)

नवतपा: या 9 दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या

मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ येतो ज्यामुळे प्रचंड उन्हाळा जाणवतो. ह्यालाच नवतपा म्हणतात. या दिवसात उन्हात बाहेर निघण्या पासून वाचण्या व्यतिरिक्त आपल्याला खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावयाला हवी. नाहीतर आपल्याला आजारी पडायला वेळ लागणार नाही. चला मग जाणून घेऊया की नवतपा मध्ये आपला आहार कसा असला पाहिजे आणि काय खाणं टाळावं.
 
1 उन्हाळ्यात येणाऱ्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात. त्यासाठी फळे भरपूर खावे.
 
2 कलिंगड, खरबूज, काकडी हे नियमाने खाल्ल्याने शरीरात पाण्याबरोबरच खनिज लवणांची कमतरता दूर होते.
 
3 या दिवसात वरण, भात, भाजी, पोळी खाणे चांगले राहते. उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमीच खाणे चांगले असतं. जेणे करून आपल्या अन्नाचे पचन पण व्यवस्थित होईल आणि शरीर टवटवीत राहील. तळलेल्या वस्तू जास्त प्रमाणात खाऊ नये. अन्यथा आपल्या पचनास बिघाड होऊ शकतो.
 
4 नवतपाच्या कडक उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाच्या रूपाने निघून जातं त्यासाठी दिवसातून किमान 4 लीटर पाणी प्यायला हवं.
 
5 या दिवसांत प्रचंड उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक, लस्सी, प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात तळलेले आणि चमचमीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असते. पण या दिवसात हे खाणे टाळल्यास चांगलंच आहे. 
 
6 जेवणात जास्त मीठ घेऊ नये. फरसाण, शेंगदाणे, तळलेले पापड, चिप्स आणि तळलेले खाद्य पदार्थ घेऊ नये.
 
7 नवतपाच्या प्रचंड उष्णतेमध्ये मासे, कोंबडी, सी फूड, आणि जास्त गरिष्ठ पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे जास्त घाम येतो आणि पचनाच्या तक्रारी उद्भवतात.
 
8 नवतपामध्ये जंक फूड जसे पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे.
 
9 चहा आणि कॉफी सारख्या पेय टाळणेच सोयीस्कर आहे. कॅफिन आणि इतर पेय आपल्या शरीराच्या उष्णतेला वाढवते. त्याच बरोबर शरीरात निर्जलीकरण म्हणजे पाण्याची कमतरता वाढवते.
 
10 या दिवसांत सॉस खाणे टाळावं. सॉस मध्ये 350 कॅलोरी आढळते जेणे करून आपल्यामध्ये आळशीपणा येऊ शकतो. काही प्रकारांच्या सॉस मध्ये मीठ आणि MSG (मोनोसोडियम ग्लुटामेंट) आढळतं, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. त्या ऐवजी उन्हाळ्यात पौष्टिक आणि नैसर्गिक अन्नासह ताक, लस्सी, लिंबू-पाणी, शिकंजी, आणि आंब्याचे पन्हे या सारख्या द्रवांचे सेवन करायला हवं.