शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (18:02 IST)

कलिंगड खा पण योग्य पद्धतीने, उन्हाळ्याचा त्रास जाणवणार नाही, वजन देखील कमी होईल

उन्हाळा आपल्या वेगाने वाढत चालला आहे. सध्याचा काळात कोरोना महामारीने देखील उच्छाद मांडला आहे. वाढत्या उन्हाळाच्या शमविण्यासाठी नाना प्रकारे आपण उपाय करीत असतो. सध्या कलिंगड मुबलक प्रमाणात येत आहेत. हे आपल्या शरीराला थंड तर ठेवतेच त्याचबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतं. या काळात कलिंगडाचा सॅलड देखील फायदेशीर असतं, त्याचबरोबर ह्याचा पासून बनवलेले पेय पदार्थांमुळे तहान शमवते, शरीरातील पाण्याच्या कमतरतेला पूर्ण होते तसेच शरीराला थंड राहण्यास मदत होते. 
 
आज आपण कलिंगडाच्या काही वेगवेगळे पदार्थ कसे बनवू शकतो जाणून घेऊया......
1 कलिंगडाची आइसक्रीम :
कलिंगडाचे गर काढून बारीक मॅश करून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावं. दुधामध्ये कॉर्न फ्लोअर टाकून घोळ बनवून घ्यावं. उरलेल्या दुधाला एका भांड्यात टाकून उकळून घ्यावं. या घोळामध्ये व्हॅनिला इसेंसच्या काही थेंब टाकून उकळून घ्यावे. थंड झाल्यावर झाकून फ्रीजर मध्ये ठेवून द्यावे. गोठल्यावर यामध्ये साय आणि कलिंगड मिसळून द्यावे. चांगले मिसळून पुन्हा सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यावे. 
फायदे : रक्तदाब नियंत्रित राहील, चांगल्या प्रकारे पचन होईल.
 
2 कलिंगडाचे सॅलड : 
सर्वप्रथम एका पात्रात डाळिंबाचे रस, कलिंगड, खरबूज, द्राक्षे आणि आपल्याला आवडत असलेले फळं बारीक चिरून मिसळून घ्या. या चिरलेल्या फळांवर चाट मसाला टाकून खावे. आपण यात सुके मेवे जसे काजू, बदाम देखील टाकू शकता. कलिंगडाचे बियाणे फेकून न देता खाऊ देखील शकता.
फायदे : वजन कमी करतं आणि भूक कमी होते तसेच प्रतिरोधक क्षमता वाढते.
 
3 कलिंगड लेमोनेड : 
कलिंगडामध्ये साखर, पुदिन्याचे पान आणि लिंबाचा रस घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्या. सर्व्ह करण्यासाठी ग्लासात लिंबाचे बारीक काप, पुदिन्याचे पान, बर्फाचे तुकडे, कलिंगडाचे 1 चतुर्थांश मिश्रण, सोडा किंवा शीत पेय (सॉफ्ट ड्रिंक) टाकून प्यावं.
फायदे : शरीरातील टॉक्सिन्स दूर करतं. वाढत्या वयाचा प्रभाव कमी करतं.
 
चेतावणी : कलिंगड खाण्याआधी हे लक्षात ठेवावे
1 मूत्रपिंड (किडनी)चा किंवा हृदयरोग संबंधित त्रास असल्यास कलिंगड रात्री खाणे टाळावं.
2 कलिंगडामध्ये साखर मुबलक प्रमाणात असते. हे खाऊन रात्री झोपल्यावर वजन देखील वाढू शकतं. यासाठी हे रात्री खाणे टाळावे.
3 कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असतं रात्री खाल्ल्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागू शकतं.