बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (18:29 IST)

टाइगर श्रॉफचा 'बागी 3' ठरला या वर्षाचा म्हणजे 2020 चा सर्वात यशस्वी चित्रपट !

वर्ष 2020चे पहिले सहा महीने मनोरंजन विश्वासाठी कठिण गेले. काही चित्रपट हिट ठरले तर, काही अपयशी ठरले. मात्र, वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात, टाइगर श्रॉफचा 'बागी 3' 2020 सालाची सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली.  टाइगर श्रॉफ च्या बागी 3 ला बॉक्स ऑफिसवर पर जबरदस्त प्रतिसाद मिळत होता मात्र, अचानक, कोविड-19 च्या प्रसाराचे संकट रोखण्यासाठी चित्रपटगृहे बंद करण्यात आली. मात्र तरीही चित्रपटाने जगभरात 135.08 करोड चा बिझनेस केला आणि शेवटच्या दिवशी देखील 6.5 करोडचे चांगले कलेक्शन करण्यात चित्रपटाने यश मिळवले. जर लॉकडाउन नसते तर, चित्रपट बॉक्स ऑफिसवर याहून अधिक दमदार कमाई करण्यात यशस्वी झाला असता.
 
बागी 3 ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 17.50 करोडची कमाई केली होती, जो 2020 मध्ये बॉलीवुड फिल्म्ससाठी आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग डे कलेक्शन आहे आणि जगभरात एकूण 135.08 करोडचे कलेक्शन आहे. टाइगर श्रॉफने नेहमीच धमाकेदार अंदाजात एक्शन दृश्य सादर केली आहेत आणि बागी फ्रैंचाइसी याचा पुरावा आहे.  'जगाचा सर्वात कमी वयाचा एक्शन स्टार' आपली नुकतीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेतो आहे आणि सोबतच, दर्शकांकडूनही त्याला खास करून त्याच्या एक्शन स्किल्ससाठी नि:सीम प्रेम मिळत आहे.
 
टाइगर सध्या 'बागी 3' च्या यशाचा आनंद घेतो आहे आणि 16 जुलै 2021 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या आपल्या आगामी चित्रपट 'हीरोपंती 2' च्या शूटिंगसाठी पूर्णपणे तयार आहे.