शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. कुजबूज
Written By अभिनय कुलकर्णी|

पुस्तक प्रसारातून निवडणूक प्रचार!

येत्या विधानसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुण्याच्या एका अपक्ष उमेदवाराने अभिनव मार्गाचा अवलंब केला आहे. वाचन संस्कृती वाढीला लावण्याच्या उदात्त हेतुचा हवाला देत या उमेदवाराने मतदारांना घरोघर वाटलेल्या पत्रातून ४० पुस्तकांची यादी पाठविली आहे.

यादीतील आपल्या आवडीच्या पुस्ताकावर खूण करून तसे उमेदवाराच्या कार्यालयास सूचित केल्यास त्या पुस्तकाची नवी कोरी प्रत संबंधित मतदाराला घरपोच देण्यात येईल असे आश्वासनही या पत्रात देण्यात आले आहे. या आश्वासनाची खातरजमा करून घेण्यासाठी एका मतदाराने झाडाझडती या विश्वास पाटीललिखित पुस्तकाची पसंती कळविली असता त्याला त्या पुस्तकाची प्रतही पाठविण्यात आल्याचे कळते. मात्र त्या पुस्तकात आपल्या नावाचा बुकमार्क टाकण्यासही उमेदवार महाशय विसरलेले नाहीत.

मताची वाढती किंमत
सलग चौथ्यांदा निवडणूक लढविण्यार्‍या एका उमेदवाराने दिलेल्या उद्बोधक माहितीनुसार पहिल्यांदा निवडणूक लढविताना एकाही मताची खरेदी करावी लागली नाही तर दुसर्‍या निवडणूकीत मला १००० मते पैसे देऊन विकत घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले. तिसरी निवडणूक लढविताना जवळपास सर्व मतांसाठी या महाशयांनी किंमत मोजली. आता चौथ्या वेळी निवडणूक लढविताना ही किंमत किती वाढणार या विवंचनेत हे उमेदवार आहेत.