शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. प्रयाग कुंभमेळा 2019
Written By

Kumbh Mela 2019: शाही स्नानाच्या तारखा आणि महत्त्व जाणून घ्या

14-15 जानेवारी 2019, सोमवार व मंगळवार: मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान)
21 जानेवारी 2019, सोमवार: पौष पौर्णिमा
31 जानेवारी 2019, गुरुवार: पौष एकादशी स्नान
04 फेब्रुवारी 2019, सोमवार: मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दुसरं शाही स्नान)
10 फेब्रुवारी 2019, रविवार: वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान)
16 फेब्रुवारी 2019, शनिवार: माघी एकादशी
19 फेब्रुवारी 2019, मंगळवार: माघी पौर्णिमा
04 मार्च 2019, सोमवार: महाशिवरात्री
 
मकर संक्रांती
या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन तांदूळ आणि तीळ स्पर्श करून दान करावे. या दिवशी खिचडीचे सेवन करावे.
 
पौष पौर्णिमा
या दिवशी स्नान ध्यान केल्यानंतर दान पुण्य केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले गेले आहे. या दिवसापासून शुभ कार्य आरंभ होतात.
 
पौष एकादशी
पौष एकादशीला शाही स्नान केल्यावर दान पुण्य करावे.
 
मौनी अमावस्या
या दिवशी कुंभाचे प्रथम तीर्थाकर ऋषभ देव यांनी आपली तपस्येचा मौन व्रत सोडला होता आणि संगमच्या पवित्र पाण्यात स्नान केले होते. या दिवशी लाखो भक्त कुंभ स्नान करण्यासाठी उपस्थित राहतात.
 
वसंत पंचमी
हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी सरस्वती जन्माला आली होती म्हणून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे.
 
माघी पौर्णिमा
माघ पौर्णिमेला दान-धर्म आणि स्नान याचे विशेष महत्त्व आहे. ब्रह्मवैवर्त पुराणाप्रमाणे या दिवशी स्वयं प्रभू विष्णू गंगा जल मध्ये निवास करतात. केवळ या दिवशी स्नान केल्याने देखील पूर्ण माघ मास स्नानाचे पुण्य मिळतं.
 
माघी एकादशी
या दिवशी दान केल्याने अनेक पाप नष्ट होतात.
 
महाशिवरात्री
हा दिवस पावन असून या दिवशी अंतिम स्नान आहे. या दिवशी कुंभ मध्ये सामील सर्व भक्त संगमध्ये डुबकी लावतात. देव लोकात देखील या पर्वाची आतुरतेने वाट बघितली जाते.