गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Updated : बुधवार, 20 एप्रिल 2022 (13:34 IST)

CBSE Term 2 Board Exam Tips : प्रश्नपत्रिका हातात आल्यावर आधी हे काम करा, वाचा टिप्स

आता लवकरच बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार, परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांवर ताण येतो. प्रश्नपत्र कसे येणार, वेळ पुरणार की नाही. असं प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते. 
 
इयत्ता 10वी-12वी टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहेत आणि 24 मे पर्यंत चालणार आहेत. त्याचबरोबर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सर्वप्रथम काय करावे , हे जाणून घ्यावे.
 
प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर, उत्तरे कोठून आणि कशी लिहायला सुरुवात करावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. सीबीएसईने आधीच सांगितले आहे की, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटे अतिरिक्त दिली जातील. मात्र, विद्यार्थी त्या 20 मिनिटांचा पुरेपूर उपयोग करत नाहीत आणि तणावात प्रश्नपत्रिका वाचतात, त्यामुळे घाईघाईने त्यांना प्रश्न नीट समजत नाहीत. अशा परिस्थितीत, प्रत्येक विद्यार्थ्याने आधीच एक धोरण तयार केले पाहिजे, जेणेकरून ते परीक्षेच्या वेळी अचूकपणे उत्तरे लिहू शकतील.
 
*  परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर शांत व्हा आणि तुमच्या मेंदूला सांगा की सर्व काही ठीक आणि सामान्य आहे आणि तणाव किंवा काळजी करू नका.आणि  दरवर्षी दिलेल्या इतर परीक्षांप्रमाणेच ही एक परीक्षा आहे.
 
*  प्रथम प्रश्नपत्रिकेची पाने मोजा आणि प्रश्नांची संख्या तपासा. प्रश्नपत्रिकेत छपाईची चूक तर नाही ना हेही तपासून घ्या.
 
* यानंतर, तुम्हाला आवश्यक असलेले तपशील जसे की रोल नंबर किंवा प्रश्नपत्रिकेवर आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट भरावी लागेल. तणाव आणि गर्दीमुळे बहुतांश विद्यार्थी प्रश्नपत्रिकेवर आवश्यक ती माहिती लिहायला विसरतात. असे अजिबात करू नका.गोंधळून जाऊ नका.
 
* बोर्ड 15 मिनिटे प्रश्न वाचण्यासाठी देणार आहे. ही 5 मिनिटे प्रश्नपत्रिका नीट वाचून पेपरचे सर्व विभाग सोडवण्याची रणनीती तयार करायची आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा.
 
*  ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चांगली माहीत आहेत त्यांना प्राधान्य द्या. हे प्रश्न आधी सोडवावेत आणि नंतर अवघड किंवा किचकट वाटणारे इतर प्रश्न करावे.
 
* पेपर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 तास दिले जातील. प्रत्येक विभागाला पुरेसा वेळ द्या आणि नंतर प्रश्नांचा प्रयत्न करा. परीक्षेतील प्रत्येक प्रश्न सोडवताना या वेळेची मर्यादा पाळल्याची खात्री करा. त्यामुळे पेपर वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.
 
*  शेवटी, परीक्षेची लेखन रणनीती तयार करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्नोत्तरांचा प्रयत्न करण्यासाठी वापरली जाणारी महत्त्वाची सूत्रे आणि समीकरणे लिहू शकता. कधी कधी उत्तर लिहिताना आपल्या मनात अशा अनेक गोष्टी चालू असतात की तुम्ही उत्तरात वापरलेला फॉर्म्युला किंवा एखादा विशिष्ट शब्द विसरता. या प्रकरणात, ही पद्धत आपल्याला आठवण्यासाठी मदत करेल.