शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (23:44 IST)

बीएससी नर्सिंगसाठी आता नीट २०२१ परीक्षा द्यावी लागणार

बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्या इच्छुक विद्यार्थ्यांना आता नीट २०२१ परीक्षा द्यावी लागणार आहे. बीएससी नर्सिंगसह वैद्यकीय अभ्यासक्रमात पदवी करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने अर्ज मागविले आहेत. यासाठी १० ऑगस्टपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थी 
अर्ज करू शकतात. एनटीएकडून १२ सप्टेंबरला नीट २०२१ परीक्षा घेतली जाणार आहे.
 
परीक्षेसाठी पात्रता
– बीएससी (नर्सिंग) मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत १७ वर्षे हवे.
– विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायन विज्ञान, जीव विज्ञानशास्त्र (पीसीबी) आणि इंग्रजीसह १२ ची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तसेच पीसीबीमध्ये ४५ टक्क्यांपर्यंत गुण हवेत.
– राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त ओपन स्कूल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (एनआयओस) मधून विज्ञान आणि इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी बीएससी नर्सिंगसाठी पात्र असतील.
– अनुसूचित जाती-जमाती किंवा इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पीसीबीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक आहेत.
– दिव्यांग उमेदवारांसाठी ३ टक्के दिव्यांग आरक्षणाला लोकोमोटरच्या दिव्यांगांच्या खालच्या स्तराला ४० ते ५० टक्क्यांपर्यंत मानले जाईल.
– बीएससी नर्गिंस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी १२ वीमध्ये इंग्रजी विषय अनिवार्य आहे.फक्त नीट २०२१ परीक्षा देऊ इच्छिणार्या उमेदवारांसाठीच पात्रतेचे निकष लावण्यात आलेले आहेत. महाविद्यालय किंवा वैद्यकीय संस्थांना ते गैरलागू आहेत. 
 
संबंधित महाविद्यालये / संस्थांच्या पात्रता निकषांची पडताळणी प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.