सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 2 नोव्हेंबर 2025 (11:49 IST)

हिंजवडीत प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणीवर चॉपरने हल्ला, प्रियकर ताब्यात

crime
हिंजवडीत प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणीवर चॉपरने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी 4:15च्या सुमारास घडली असून या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रियकर व  इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते मात्र आरोपी विवाहित असून त्याची पत्नी प्रेम संबंधामुळे घर सोडून गेली. नंतर आरोपीने तरुणीवर लग्नासाठी दबाब टाकला.मात्र तरुणीचे दुसऱ्या युवका सोबत प्रेमसूत जुडले. 
आरोपीला हे समजल्यावर तो संतापला आणि शनिवारी दुपारी आपल्या साथीदारांसह साखरे वस्ती परिसरात पोहोचला आणि त्याने रागाच्या भरात येऊन चॉपरने तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर दुखापत झाली आहे.
 ALSO READ: पुणे : माजी हवाई दलाच्या सैनिकाने शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 97 लाख रुपये गमावले
तरुणीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तिला उपचारासाठी दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु केले असून डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला त्वरित ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit