पुण्यातील ही व्यक्ती 'प्लाझ्मा बँक', आईकडून प्रेरणा घेत 14 वेळा प्लाझ्मा दान केले

Ajay Munot plasma donar
Last Updated: सोमवार, 10 मे 2021 (18:53 IST)
देशातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे थैमान सुरूच आहे. साथीच्या रोगात कोट्यवधी लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. काही लोक आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत आणि काही लोक इतरांचे जीवन वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावत आहे. अशी एक व्यक्ती आहे, ज्यांनी अनेक लोकांना प्लाझ्मा दान करून नवीन जीवन दिले आहे. त्यांनी 14 वेळा प्लाझ्मा दान करण्याचा विक्रम केला आहे. त्यांना याची प्रेरणा आपल्या आईकडून मिळाली.
पुणे शहरातील 50 वर्षीय अजय मुनोत यांनी आतापर्यंत 14 वेळा आपला प्लाझ्मा दान केला आहे. शरीरातील अ‍ॅटीबॉडीज दान करून लोकांचे प्राण वाचवण्याच्या भावनेमुळे अजय यांनी अजून लस देखील घेतली नाही जेणेकरून प्लाझ्मा दान करण्यात अडथळा येऊ नये. असे म्हटले जात आहे की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही एकाच व्यक्तीने 14 वेळा प्लाझ्मा दान केल्याची पहिली घटना समोर आली आहे.

अजय मुनोत जुलै 2020 मध्ये कोरोना संक्रमित झाले होते. रिकव्हर झाल्यावर ते सतत लोकांच्या मदतीसाठी प्लाझ्मा डोनेट करत आहे. या नऊ महिन्यात त्यांनी 14 वेळा ब्लड बँकेत प्लाझ्मा डोनेट केले आहे. त्यांनी म्हटलं की जोपर्यंत शरीरात अँटीबॉडी बनत राहतील तोपर्यंत मी प्लाझ्मा दान करीतच राहीन. सामान्यतः निरोगी माणूस 14 दिवसांच्या कालावधीत आपला प्लाझ्मा दान करू शकतो.
त्यांनी सांगितले की त्यांची आई ‘O’ निगेटिव्ह ब्लड डोनर होती. युनिव्हर्सल डोनर असल्याने त्या सतत रक्त दान करायच्या. त्यांना पुण्याच्या आर्मी ऑफिसहून ब्लड डोनेट करण्यासाठी फोन येत असे. त्या रक्तदानासाठी जात असताना अजय देखील सोबतच असायचे म्हणून त्यांनी आईकडून प्रेरणा घेतली आणि भविष्यात असेच काही करण्याचे ठरविले होते जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील. आज आईची प्रेरणा घेऊन ते प्लाझ्मा डोनेट करत आहे. आता तर त्यांचे मित्र आणि नातेवाईक त्यांना प्लाझ्मा बँक म्हणून हाक मारतात.
Ajay Munot mother
अजय यांनी म्हटले की त्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही कारण त्यांना प्लाझ्मा डोनेट करणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यांनी दावा केला आहे की 14 वेळा प्लाझ्मा डोनेट केल्यामुळे त्यांचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
photo credit: @AjayMunot2


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

जाणून घ्या कोण आहेत ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल, भारताशी ...

जाणून घ्या कोण आहेत ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल, भारताशी आहे जवळचे नाते
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या सीईओची जबाबदारी एका भारतीयावर ...

Oppo F21 सीरीजसाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल, पुढच्या ...

Oppo F21 सीरीजसाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल, पुढच्या वर्षी होईल लॉन्च
Oppo यावर्षी दिवाळीपूर्वी स्मार्टफोनची F21 मालिका लॉन्च करणार होते, परंतु तसे झाले नाही. ...

वाचा, शिक्षण विभागाकडून शाळांसांठी जाहीर केलेल्या ...

वाचा, शिक्षण विभागाकडून शाळांसांठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना
राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ...

राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही :टोपे

राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही :टोपे
देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही ...

नवीन नियमावली व्यापारी वर्गांमध्ये नाराजी निर्माण करणारी व ...

नवीन नियमावली व्यापारी वर्गांमध्ये नाराजी निर्माण करणारी व अराजकाला आमंत्रण देणारी
कोरोना च्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन ...