1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. 899 kg fake paneer stock seized in cat in Pune

पुण्यात मांजरीमध्ये ८९९ किलो बनावट पनीर साठा जप्त

पुण्यात मांजरीमध्ये बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात ८९९ किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आला आहे. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे.
 
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत.याच काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. आज हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द इथल्या मे. आर. एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा मारला. यावेळी तब्बल २ लाखांचा ८९९ किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला.
 
बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे लाखोंचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलंय. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे. तसेच, त्यासाठी एक टोलफ्री क्रमांकही जारी केला आहे. बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात यावी, असं आवाहन केलं आहे.
पुढील लेख
एनएसईचे माजी सीईओ रवी नारायण यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी ने अटक केली