शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (11:57 IST)

9 वर्षांच्या मुलावर बिबट्याची झडप, पुण्यातील घटना

leopard
पुण्यातील खेड तालुक्यात रेटवडी गावात नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकरी हादरले आहे. सार्थक नवनाथ वाबळे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. गेल्या पंधरा दिवसात ही दुसरी घटना घडली आहे. 
 
रेटवडी येथील वाबळे वस्तीतील रहिवासी नवनाथ वाबळे हे आपल्या मुला सार्थक सह संध्याकाळी 7:15 वाजेच्या सुमारास गुरांच्या गोठ्यातून घरी जात असताना सार्थकने त्याच्या पाळीव कुत्र्याच्या पिल्ल्याला कडेवर घेतले होते. तेवढ्यात झुडप्यात लपून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या सार्थकवर हल्ला केला. सार्थक या हल्लेमुळे घाबरला त्याला या हल्ल्यात पोटावर आणि दंडावर मोठ्या जखमा झाल्या आहे. बिबट्याने सार्थकवर हल्ला केला बघून सार्थकच्या वडिलांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे बिबट्याने सार्थकच्या हातातील कुत्र्याचे पिल्लाला घेऊन धूम ठोकली. या घटनेमुळे रेटवडी  गावातील नागरिक हादरले आहे.