सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (13:56 IST)

धक्कादायक ! 67 वर्षाच्या नराधमा कडून 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार ,पुण्यातील घटना

अलीकडील महिलांवर अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून आता महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली असून या प्रकारणांमध्ये पुन्हा एक नवे प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील पिंपरीत एका 5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 67 वर्षीय वासनांध नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिघी पोलिसठाण्याच्या हद्दीत घडली आहे.पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या दिघी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी शशिकांत आबासाहेब तापकीर(67) या नराधमाला अटक करण्यात आली आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीला त्याच्या दुचाकीवरून पेरूच्या बागेत घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. मुलीने आपल्या आईला घडलेले सांगितले आणि आईने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक जेल आहे. न्यायालयाकडून आरोपीला कोठडी सुनावण्यात आली आहे.