1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:19 IST)

5 डिसेंबरला पिंपरी – चिंचवड हाफ मॅरेथॉन ; 5, 10 आणि 21 किलोमीटर असेल स्पर्धा

पिंपरी- चिंचवड हाफ मॅरेथॉनची तारीख ठरली असून, 5 डिसेंबर 2021 रोजी पिंपळे सौदागर येथे ही स्पर्धा रंगणार आहे. 5, 10 आणि 21 किलोमीटर अशी तीन प्रकारात ही स्पर्धा असणार असेल, विजेत्यांना रोख बक्षिस मिळणार आहे, याशिवाय सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू मिळणार आहेत.

सहभागी स्पर्धकांना टि-शर्ट, वेळेचे प्रमाणपत्र, फिनिशर मेडल, गुडी बॅग, झुंबा सेशन, आरोग्यदायी नाश्ता, मोफत फोटो आणि मॅरेथॉन मार्गासाठी सहकार्य केले जाईल. तर, विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे. रस्ते सुरक्षा ही या मॅरेथॉनचा उद्देश आहे.

पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनसाठी नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये 5 कि.मी. साठी 800, 10 कि.मी. साठी 1200 आणि 21 कि.मी. साठी 1500 रूपयांचे नोंदणी शुल्क असेल.