1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (20:28 IST)

सतत रडते म्हणून भावाकडून 3 महिन्याच्या बहिणीचा गळा आवळून खून

Murder by strangling 3-month-old sister by brother as she cries constantly
बेपत्ता झालेली तीन महिन्याच्या मुलीला तिच्या भावानेच नदीपात्रात टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील एका धक्कादायक घटनेत अवघ्या 3 महिन्याच्या बहिणीला गळा आवळून खून केल्यानंतर पिशवीत टाकून ती पिशवी नदीपात्रात फेकणार्‍या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले गेले आहे. या प्रकरणी शनिवारी अपहरणाचा गुन्हा येरवडा पोलिसांनी दाखल केला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार येरवडा चित्रा चौक येथील 3 महिन्याची झोपलेली बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांना दिली होती. येरवडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करताना सदर बेपत्ता मुलीची आई तसेच 13 वर्षाचा मोठा भाऊ यांच्याकडे सखोल तपास करताना काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. अधिक तपासात कळले की सख्ख्या भावानेच तीन महिन्याच्या बहिणीचा गळा आवळून तिला पिशवीत भरुन पर्णकुटी चौकातील नदीपात्रात फेकून दिले.
 
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर सदर बालिकेचा पिशवीत मृतदेह सापडला. लहान बहिण सतत रडते म्हणून त्याने हे गंभीर कृत्य केल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सदर महिला तीन महिन्यापूर्वी भावाकडे राहण्यास आली होती जिला 13 वर्षाचा मोठा मुलगा आणि तीन महिन्याची लहान मुलगी आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.