शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (21:41 IST)

पत्नीच्या औषधोपचाराच्या खर्चाच्या तणावातून पतीने आत्महत्या केली

आजारी पत्नीच्या औषधोपचाराच्या खर्चाच्या तणावातून पतीने आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातीलबारामती तालुक्यात घडली आहे. बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथील मनोहर संभाजी कुतवळ (वय-35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
पुण्यातील  एका प्रसिद्ध रुग्णालयात पत्नीवर उपचार सुरु होते. रुग्णालयाकडून पैसे भरण्यास सांगितले जात होते. मात्र, पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने मनोहर तणावात होते. त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करुन रुग्णालयात भरले होते. परंतु अजून रक्कम जमा करण्यास रुग्णालयाने सांगितले. यानंतर आज पहाटे एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
 
मयत मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्या संपर्कात होते. संबंधित रुग्णालयाला बिल कमी करण्याबाबतची प्रक्रिया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचे पाऊल उचलले.या घटनेनंतर सुनीलकुमार मुसळे यांनी ही परिस्थिती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के  यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने संबंधित रुग्णालयात जाऊन महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याचे निर्देश दिले. स्वत: सह धर्मदाय आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून थेट दवाखान्यात येत यंत्रणेला  सूचना दिल्या.