मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)

अजित पवार कमी पडत आहेत म्हणून शरद पवारांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले – चंद्रकांत पाटील

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तर पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शरद पवारांचा वाढता वावर पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही इतके मजबूत आहोत की एक अजित पवार पुरत नाहीत म्हणून त्यांच्या मदतीला शरद पवारांना यावं लागत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्र अजित पवारांकडून काढून घेण्याचा हा प्रयत्न दिसतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार लक्ष घालत असताना ते बहुधा कमी पडताहेत आहेत म्हणून पवार साहेबांना लक्ष घालावं लागत आहे .शरद पवारांचा या दोन शहरात वाढता वावर पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात देखील असाच प्रश्न निर्माण झाला. कारण मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे आयकर विभागाचा ससेमिरा लागला आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित असणारे साखर कारखाने आणि त्यांच्या नातेवाइकांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आणि अशातच शरद पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केली आहे..
 
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तर पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शरद पवारांचा वाढता वावर पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.