शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (15:30 IST)

विमाननगर येथील कंपनीतील 27 वर्षीय सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार

कंपनीत बरोबर काम करीत असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्यानंतर लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ३१४/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण अशोक शिंदे Kiran Ashok Shinde (वय २९, रा. म्हाडा सोसायटी, चंदननगर) याला अटक (Pune Crime) केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१५ ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी हे विमाननगर येथील एकाच कंपनीत कामाला आहेत.एकत्र नोकरी करीत असताना आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या रुमवर नेऊन तिची इच्छा नसताना तिच्याबरोबर शारीरीक संबंध निर्माण केले. त्यानंतर या तरुणीने लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास  करीत आहेत.